सगळी नाती नकली असतात,
वेळ आली की सगळे साथ सोडतात…!
पण,
या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात,
आणि बापाची साथ..!
आयुष्यभर सोबत राहतात…
‘कशी आहेस पोरी..?’ म्हणताना
उमटलेला स्वर
मुलीनं काळजात साठवला,
अन् हसूनचं दिलं उत्तर
“मी मजेत..”
आईला जुना दिवस आठवला.
आई, आधी जेव्हा रडू यायचं
तेव्हा तुझी आठवण यायची
आता जेव्हा तुझी आठवण येते
तेव्हा रडू येतं…!!
जिच्या हसण्याने मी स्वतःच
अस्तित्व मानतो, देवा माफ कर,
तुझ्या आधी मी माझ्या आईला मानतो.
आई..!
आई..!
या जगात खूप प्रेम वेडे
बघितले पण आईच्या
प्रेमाला टक्कर देणारा
एक पण नाही.
आपल्या
आईची
काळजी घेत जा कारण ह्या खोट्या जगात
तिच्या एवढं प्रेम करणार कोणचं भेटणार
नाही..!
आई..!
आपली आई म्हणजे
आपल्या सोबत राहणारा
खरा देव..
ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यापेक्षा
भुतकाळात जाऊन आपल्या आई वडिलांनी
आपल्यासाठी काय केले ते पहा
भविष्यकाळ आपोआप समजेल..!