प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
प्रेम असाव तर राधा कृष्णा सारखे लग्नाच्या
धाग्यात बांधलं नसलं तरी कायम हृदयात
जपलेलं
प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही
आणि ज्याला कळतं त्याला मिळतं नाही
स्त्री च्या प्रेमात जर ती जिद्द नसती
तर मंदिरात कृष्णाच्या बाजूला राधा नसती
कृष्ण येईल तुझा लवकर नको वाट पाहूस इतकी
विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर प्रीत जुळून येईल नक्की
पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा
आदि आहे श्रीकृष्ण अनंत आहे राधा